WhatsApp
WhatsAppTeam Lokshahi

WhatsApp फाईल शेअरींगची साईज अन् ग्रुप मेंबर्सची मर्यादा वाढली

WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला दोन अडचणी नक्की येतात.
Published by :
Sudhir Kakde

WhatsApp Update : आज प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये WhatsApp असणं जणू काही अनिवार्यच झालेलं आहे. प्रत्येकजण दिवसभरातून किमान तासभर तरी वेळ यावर घालवतो. मेसेज करणे, कामाचे मेसेज करणे, फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट शेअर करणे अशा अनेक गोष्टी यामाध्यमातून करता येतात. मात्र WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकाला दोन अडचणी नक्की येतात. त्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे कुठलीही मोठी व्हिडिओ फाईल शेअर करताना येणारी साईजची मर्यादा आणि दुसरी म्हणजे ग्रुप सदस्यांची मर्यादा. मात्र आता WhatsApp ने युजर्सला एक खुश खबर दिली आहे. कारण आता WhatsApp आपल्या युजर्सला तब्बल 2GB पर्यंतची फाईल शेअर करण्याची सुविधा देणार आहे. तसंच WhatsApp Group सदस्यांची मर्यादा सुद्धा आता 512 पर्यंत पोहोचली आहे. (WhatsApp gets 512 member groups and 2GB file sharing)

WhatsApp
यंदा जाणवतोय सर्वात जास्त उन्हाळा; नासाने सांगितले त्यामागील कारण...

गुरुवारी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर इमॉजी वापरून ही प्रतिक्रिया सुरू करण्याविषयी घोषणा केली. अलीकडेच मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने चॅट लिस्टवर 32 लोकांचा व्हॉइस कॉल आणि एकापेक्षा जास्त डिव्हाइस वर एक खातं वापरण्याची सुविधा दिली होती. यासह अनेक नवीन अपडेट्स करण्याची घोषणा केली आहे.

WhatsApp वर मोठ्या साईझच्या फाईल्स शेअर (Large Files Sharing) करता याव्यात अशी वापरकर्त्यांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. WhatsApp वर मोठ्या फाईल्स शेअर करताना यूजर्सना खूप त्रास होतो, मात्र ही समस्या आता संपली आहे. ही अपडेट मिळवण्यासाठी आताच तुमचं WhatsApp अपडेट करा आणि या सुविधेचा फायदा घ्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com