Ratnagiri News : कोकण सागरी महामार्ग कधी पूर्ण होणार? प्रतीक्षा कायम

Ratnagiri News : कोकण सागरी महामार्ग कधी पूर्ण होणार? प्रतीक्षा कायम

मध्यंतरी राज्याचे माजी अर्थमंत्री, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी कोकण सागरी मार्ग कोकणचा कॅलिफोर्निया या तत्कालीन सरकारच्या घोषणेचा मंडणगड येथील सभेत पुनरुच्चार केला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मध्यंतरी राज्याचे माजी अर्थमंत्री, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी कोकण सागरी मार्ग कोकणचा कॅलिफोर्निया या तत्कालीन सरकारच्या घोषणेचा मंडणगड येथील सभेत पुनरुच्चार केला. त्या अनुषंगाने अजूनही कॅलिफोर्नियाचे स्वप्न उराशी बाळगलेल्या सत्ताधाऱ्यांची ध्येयनिखिती अखेर कधी शक्य होणार?, हा प्रश्न पुन्हा एकया पुढे आला.

रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग त्यामानाने अनेक वर्षे वाला नियोजन आणि चर्चेत राहिला आहे. कोकणच्या सागरी मार्गाचे आशावादी स्वप्न कोकणांना दाखवणारे राजकारणी, आता तरी किमान कोकण किन्डरपट्टी विकसित करण्यासाठी धोरण निक्षित करतील का?, असा सवाल केला जात आहे.

पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प

ऐंशीच्या दशकानंतर आलेली विविध पक्षांची सरकारे या प्रकल्पासाठी अपयशी ठरली आहेत. हे अपयश पाहता, उदासीनतेचे दूसरे उदाहरण शोधून सुद्धा सापडणार नाही. केवळ आशावादी स्वप्न विलासामध्ये चाळीस ते पंचेचाळीस वर्षे कोकणवासीय विकासाच्या संकल्पनाच्या गप्पा मारताना दिसतात, उद्योग धंदे त्यात्या पातळीवर थोड्या बहुत फरकाने निर्माण झाले खरे, तरी कोकणातील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थोपवण्यास शासन आजही अपयशी असल्याचे दिसते. रोजगारासाठी केवळ प्रकल्प उद्योग पुरेसे ठरणार नाहीत तर ज्या बलस्थानांसाठी कोकण सर्वश्रुत आहे ते वेथील पर्यटन क्षेत्र वृन्दिंगत करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या एव्हाना लक्षात येणे अपेक्षित आहे.

याचे राजकारण्यांना महत्त्व नाही ?

समृद्धी महामार्गाचे काम वेगवान पद्धतीने होऊ शकते. तर कोस्टल मार्ग का नाही? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. समृद्धी महामार्गाबाबत राजकीय इच्छाशक्ती असल्यास काही शक्य नसल्याचे उदाहरण देता वेईल, तत्कलीन सरकारने कोकणातील बलस्थानांचे महत्व ओळखून माडलेल्या संकल्पनेवर आताच्या पिढीच्या राजकारण्यांना काम करणे अजूनही जमलेले नाही. अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com