Ratnagiri Rain
Ratnagiri RainTeam Lokshahi

यंदा मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली माहिती

राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.

राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस असे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतीय हवामान विभाग, मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी एका वृत्तसंस्थेला मान्सूनविषयी माहिती दिली आहे.

मान्सून कधी येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच आता मुंबईत यंदा १० किंवा ११ जूनला मान्सूनचे आगमन होणार आहे.९६ टक्के सरासरी पावसाचा अंदाज आहे. राज्यात यंदा ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, असा अंदाज आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com