Debt Countries : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश कोणता ?

Debt Countries : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश कोणता ?

आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) नव्या अहवालानुसार सार्वजनिक कर्ज (Public Debt) झपाट्याने वाढत असून 2030 पर्यंत हे जगाच्या एकूण GDP च्या जवळपास पोहचू शकते.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

जागतिक अर्थव्यवस्था (Global Economy) 2025 मध्ये अधिक कठीण काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) नव्या अहवालानुसार सार्वजनिक कर्ज (Public Debt) झपाट्याने वाढत असून 2030 पर्यंत हे जगाच्या एकूण GDP च्या जवळपास पोहचू शकते. हा कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानला जातो. जगातील सर्वाधिक कर्जबाजारी 10 देशांची यादीIMF ने GDP च्या टक्केवारीवर आधारित जाहीर केली आहे.

  • जपान सर्वात कर्जबाजारी देश

    IMF च्या यादीनुसार जपान पहिल्या क्रमांकावर असून त्याचे कर्ज GDP च्या जवळपास अडीचपट आहे. वृद्ध होत चाललेली लोकसंख्या, आरोग्य सेवा खर्च, आणि मंद आर्थिक वाढ हे त्यामागील प्रमुख घटक आहेत. जपानचे कर्ज 1,080.1 अब्ज डॉलर इतके आहे.

  • सूदान : संघर्षामुळे उद्ध्वस्त अर्थव्यवस्था

    कर्जबाजारी देशांच्या यादीत सूदान दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्ज GDP च्या 221.5% वर सततचे गृहयुद्ध, राजकीय अस्थिरता आणि ढासळलेली व्यवस्था यामुळे त्याचे पोहचले आहे.

  • सिंगापूर : मजबूत देश, पण प्रचंड उधारी

    तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर असून त्याचे कर्ज दीर्घकालीन गुंतवणूक बहुतांश प्रकल्पांसाठी घेतले जाते. त्यामुळे GDP च्या 175.6% इतके त्याचे कर्ज दिसते.

  • ग्रीस : मंदीतून सावरला नाही

    2010 च्या आर्थिक संकटानंतरही ग्रीसचा तणाव कमी झालेला नाही. कर्ज 147.7% इतके खर्च आणि विकास यातील असंतुलनामुळे आहे.

  • बहरीन : तेलावर अवलंबित्व ठरले महाग

    तेलाच्या कमी झालेल्या किंमतींनी बहरीनची अर्थव्यवस्था डळमळली असून आणि कर्ज GDP च्या 142.5% वर गेले.

  • इटली : मंद वाढ आणि मोठा कर्जभार

    युरोपातील मोठी अर्थव्यवस्था असलेल्या इटलीसाठी आर्थिक वाढ थांबल्यासारखी झाली आहे. त्यामुळे कर्जाचे प्रमाण 136.8% आहे.

  • मालदीव : पर्यटन संकटाचा मोठा फटका

    पर्यटनावर अवलंबून असलेल्या मालदीवमध्ये मंदी आणि विकास प्रकल्पांसाठी या क्षेत्रातील घेतलेली उधारी यामुळे कर्ज 131.8% झाले.

  • अमेरिका : महासत्ता पण कर्जाचे मोठे ओझे

    जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवरही कर्जाचे सावट आहे. अमेरिकेचे कर्ज GDP च्या 125% सरकारी खर्च आणि राजकीय धोरणांमुळे पर्यंत पोहचले आहे.

  • सेनेगल : विकास प्रकल्पांची मोठी किंमत

    GDP च्या 122.9% इतका कर्जभार मोठे प्रकल्प आणि बाह्य उधारी यामुळे सेनेगलवर आहे.

  • फ्रान्स : जास्त सार्वजनिक खर्च, कमी वाढ

    आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि इतर योजनांवरील जादा खर्चामुळे GDP च्या 116% वर फ्रान्सचे कर्ज पोहचले आहे.

Highest Debt Countries : टॉप-10 सर्वाधिक कर्जबाजारी देश 2025

जपान – 250 % जवळपास

सूडान – 221.5 %

सिंगापूर – 175.6 %

ग्रीस – 147.7 %

बहरीन – 142.5 %

इटली – 136.8 %

मालदीव – 131.8 %

अमेरिका – 125 %

सेनेगल – 122.9 %

फ्रान्स – 116 %

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com