Loksabha Election 2024 Exit Poll Live
Loksabha Election 2024 Exit Poll Live

Lok Sabha Election Exit Poll 2024 LIVE Updates : लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? भाजप की इंडिया आघाडी? वाचा लोकशाहीचा एक्झिट पोल

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात देशात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ५७ जागांसाठी आज १ जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Published by :

Loksabha Election 2024 Exit Poll Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात देशात सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात ५७ जागांसाठी आज १ जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये आणि उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे. आज शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ४ जूनला लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपला कौल माध्यमांशी संवाद साधून जाहीर करत आहेत. आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, राजकारणातील तज्ज्ञ मंडळी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या माध्यमातून या निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज बांधणार आहेत.

Loksabha Election 2024 Exit Poll : लोकशाहीमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ च्या एक्झिट पोलची चर्चा; 'हे' राजकीय विश्लेषक होणार सहभागी

१) संदीप आचार्य, ज्येष्ठ पत्रकार

२) सुनिल देशपांडे, निवडणूक विश्लेषक

३) विशाल लिंगायत, निवडणूक विश्लेषक

४) सुभाष शिर्के, जेष्ठ पत्रकार

५) विजय चोरमारे, जेष्ठ पत्रकार

६) सुनील पाटील, जेष्ठ पत्रकार

७) अशोक वानखेडे, जेष्ठ पत्रकार

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'असा' होता एक्झिट पोल

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये बहुतांश एक्झिट पोल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मांडण्यात आला होता. या लोकसभेत भाजपने बहुमताचा आकडा गाठल्यानं राजकीय विश्लेषक आणि विविध संस्थांकडून जाहीर करण्यात आलेले एक्झिट पोल खरे ठरले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएला ५४३ जागांपैकी ३५३ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला या निवडणुकीत ३०३ जागांवर बाजी मारली. पण २०१४ मध्ये हा आकडा घसरला आणि भाजपला २८२ जागांवर समाधान मानावे लागले. तसच २०२९ मध्ये युपीएल आघाडीला ९१ जागांवर विजय मिळवण्यात यश आलं होतं.

Loksabha Election 2019 Exit Poll
Loksabha Election 2019 Exit Poll

एक्झिट पोलआधी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

प्रसिद्ध राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांनी द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, भारतीय जनता पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ च्या आकडेवारीची बरोबरी करेल किंवा त्यापेक्षा थोड्या जागा जिंकू शकते. पश्चिम आणि उत्तर भागात जागांच्या संख्येत खास बदल होणार नाही, असं दिसतंय. भाजपला भारताच्या पूर्व आणि दक्षिण भागात चांगलं समर्थन मिळालं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर आणि पश्चिम भागात महत्त्वपूर्ण विजय मिळवून ३०३ जागा जिंकल्या होत्या. भाजपला पूर्व आणि दक्षिण राज्यात भाजपला जास्त जागा मिळू शकतात तसच मतधिक्क्यातही वाढ होईल. तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरल आणि तामिळनाडूत पक्षाला मजबुती मिळण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

काँग्रेस एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार, पवन खेरांनी ट्वीटरवर दिली माहिती

एक्झिट पोल संबंधीत चुकीची विचारसरणी असलेल्या भाजपला बेनकाब करण्याची आवश्यकता आहे. एक्झिट पोलमध्ये भाग घेण्याबाबत आणि विरोधकांची भूमिका लक्षात घेत एक्झिट पोलच्या चर्चासत्रात इंडिया आघाडीचे तमाम सदस्य सहभागी होणार आहेत, हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेरा यांनी दिलीय.

एक्झिट पोलच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी केला मोठा दावा

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये इंडिया आघाडी कमीत कमी २९५ जागा जिंकेल, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे? जेष्ठ पत्रकार सुभाष शिर्के म्हणाले...

मुंबईतील सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. यावर प्रतिक्रिया देताना जेष्ठ पत्रकार सुभाष शिर्के म्हणाले, या सहा लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. ५०.६ टक्के इतकं मतदान झालं आहे. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात ५३.६ टक्के मतदान झालं आहे. मुंबई उत्तर मध्य भागात ५१.५८ टक्के मतदान झालं. मुंबई उत्तर-पूर्व ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिमला ५४.८४ टक्के मतदान, मुंबई उत्तरमध्ये ५७.२ टक्के मतदान झालं. म्हणजे सर्वात जास्त मुंबई उत्तर भागात मतदान झालं. अनेक लोकांना रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क न बजावता परत जावं लागलं. त्यामुळे मुंबईच्या वातावरण पाहिलं तर लोकांमध्ये उत्सुकता होती. पण निवडणुकीच्यावेळी त्या उत्सुकतेवर निवडणूक आयोगाने पाणी फेरलं. मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना टक्कर झाली. दोन्ही पक्षांच्या लोकांनी जीव तोडून काम केलं आहे. शिवसेनेते फूट पडल्याने मराठी माणूस विभागला गेला आहे. याचा परिणाम निवडणूक निकालात काय होणार आहे, हे पाहावं लागणार आहे.

"यंदाची लोकसभा निवडणूक न भुतो न भविष्यतो...."; निवडणूक विश्लेषक विशाल लिंगायत म्हणाले...

या वर्षीची निवडणूक ही भूतो न भविष्यतो अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे. त्याची कारणं म्हणजे 220 आमदार जवळपास महायुतीच्या बाजूने होती. जवळपास 40 खासदार महायुतीच्या बाजूने होती. पहिल्यांदा इतिहासामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत निवडणूकीपूर्वी इलेक्शन लढत होते. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा एक गट, राष्ट्रवादीचा एक गट वेगवेगळा तयार होऊन तो भाजपसोबत राष्ट्रवादी पहिल्यांदा निवडणूकीपूर्वी लढत होती. तर या निवडणुकीमध्ये 14 आणि 19 तारखेमध्ये मोदींची लाट तशीच होती की नाही. राम मंदिराचा मुद्दा चालणार आहे की नाही? हिंदुत्वाचा मुद्दा चालणार आहे की नाही? महागाईच्या मुद्द्याचा परिणाम होऊ शकतो का? मराठा आंदोलनाचा परिणाम होणार का? मुंबईमधील महाराष्ट्राबाहेर जे उद्योग गेले जो आरोप केला जातो विरोधकांकडून गुजरातमध्ये उद्योग नेण्यात आलं. त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये होणार का? राहुल गांधींकडून त्यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम होणार का?, संविधान बचावचा एसटी आणि एनटीमध्ये प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम त्यांच्या मतावर होणार का? नक्कीच हा एक्झिट पोल आश्चर्यकारक असणार आहे.

Beed Exit Poll 2024 : बीडचा कौल कुणाला?

बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंडे बाजी मारु शकतात. महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यात लढत होत आहे. लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलनुसार बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर आहेत, तर बजंरग सोनावणे पिछाडीवर आहेत.

Kolhapur Exit Poll 2024 : कोल्हापुरमध्ये कोण मारणार बाजी?

कोल्हापुरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आहेत तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आहेत. या दोघांमध्ये लढत होणार आहे. लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापुरमध्ये शाहू महाराज छत्रपती आघाडीवर असून संजय मंडलिक पिछाडीवर आहेत.

Ahmednagar Exit Poll 2024 : अहमदनगरमध्ये कोण आघाडीवर ?

अहमदनगरमध्ये शरद पवार गटाकडून निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. महायुतीकडून भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील उमेदवार आहेत. लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलनुसार अहमदनगरमधून निलेश लंके आघाडीवर असून डॉ. सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत.

लोकसभा निवडणूक २०२४ : देशासह महाराष्ट्राचा लोकशाहीचा एक्झिट पोल एकदा पाहाच

लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला ३८० जागा मिळणार असून इंडिया आघाडीला १२३ जागा मिळणार आहेत. इतर पक्षांना ४० जागा मिळतील. यामध्ये भाजपला ३२४, काँग्रेसला ६४, टीएमसीला १३, आम आदमी पक्षाला २ तर इतरसाठी ४० जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला २१, मविआला २६ आणि इतरसाठी १ जागा मिळेल.

लोकसभा निवडणूक 543/543

एनडीए : 380

इंडिया आघाडी : 123

इतर : 40

भाजप : 324

काँग्रेस : 64

टीएमसी : 13

आम आदमी पक्ष : 2

इतर : 40

महाराष्ट्रातील एक्झिट पोल : 48/48

महायुती : 21

मविआ : 26

इतर : 1

Lokshahi Exit Poll
Lokshahi Exit Poll

'असा' आहे कोकणचा लोकशाहीचा एक्झिट पोल

Kokan Lokshahi Exit Poll
Kokan Lokshahi Exit Poll
Lokshahi Exit Poll
Lokshahi Exit Poll
Rudra Exit Poll
Rudra Exit Poll
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com