HSRP : HSRP नंबरप्लेटसाठी नवीन अंतिम मुदत, जाणून घ्या कोणत्या गाड्यांना अनिवार्य
राज्य सरकारने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP अनिवार्य केली आहे. यासाठी गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती जी आता एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जर वेळेच्या आधी ही नंबर प्लेट बसवली नाही, तर नागरिकांकडून दंड देखील आकारण्यात येणार आहे.
महाराष्ट्र परिवहन विभागाने हा नियम लागू केल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की, नक्की HSRP नंबरप्लेट कोणत्या गाड्यांना लावणे अनिवार्य आहे? सरकारच्या नियमानुसार, ज्या गाड्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत झाल्या आहेत, त्यांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. एप्रिल 2019 पूर्वी उपलब्ध असलेल्या नंबर प्लेट्समध्ये अनेक गैरवापर होत होते.
या नंबर प्लेट सहजपणे काढता आणि बदलता येत होत्या. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली. HSRP नंबर प्लेट्स लागू झाल्यानंतर, कार चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत कारण या नंबर प्लेट्स फक्त एकदाच वापरता येतात. याच कारणामुळे HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे.