BJP : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( BJP ) संसदेचे हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू झालं आहे. हे अधिवेशन 1 डिसेंबर ते 19 डिसेंबरपर्यंत असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व्हीप जारी करण्यात आला असून भाजपच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला आहे.
15 ते 19 डिसेंबर दरम्यान सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला असून सर्व खासदारांनी संसदेत राहावं उपस्थित राहावं लागणार असल्याची माहिती मिळत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी अतिरिक्त निधीच्या मागण्यांवर चर्चा आणि मंजुरी मिळवण्यासाठी हा व्हिप महत्त्वाचा मानला जात आहे.
या कालावधीत लोकसभेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आणि सरकारी भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात व्हीप जारी
भाजपच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी
15 ते 19 डिसेंबर दरम्यान सर्व खासदारांना व्हीप
