Air India Plane Crash : DGCA नं निलंबित केलेल्या 'त्या' तिघांवर होत्या महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी; दांडगा अनुभव असूनही झाली 'ही' चूक
अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण अपघातात विमानातील 241 प्रवाशांसाह ते विमान ज्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर पडले, तेथील विद्यार्थी डॉक्टर्स मिळून आतापर्यंत 274 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरून गेलं आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हे विमान क्रॅश झालं असल्याची माहिती आहे. मात्र या भयानक अपघातामुळे विमान सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विमान अपघाताप्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात DGCA ने एअर इंडियाच्या तीन प्रमुक अधिकाऱ्यांना निलंबित केले. या प्रकरणात विमान प्रशासनाने त्या तिघांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.
या विमान अपघाताप्रकरणी क्रू ड्युटी शेड्युलिंग आणि रोस्टरिंगमध्ये मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला गेला आहे. या संदर्भात एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांना दोषी मानण्यात आले आहे. चुरा सिंग (विभागीय उपाध्यक्ष), पायल अरोरा (क्रू शेड्युलिंग-प्लॅनिंग) आणि पिंकी मित्तल (चीफ मॅनेजर, क्रू शेड्युलिंग) अशी या तिघांची नावे असून विशेष म्हणजे या तिघांनाही प्रदीर्घ वर्षांचा अनुभव असूनही त्यांच्या केवळ निष्काळजीपणामुळे हा अहमदाबादचा भयानक विमान अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. काम करताना केलेल्या चुकीमुळे या अधिकाऱ्यांवर DGCA ने कडक कारवाई करत त्यांना कामावरून बडतर्फ केले आहे.
27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव तरीही...
या तिघांपैकी 27 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पिंकी मित्तल यांना विमानाच्या क्रू शेड्युलिंग, ऑपरेशन्स मॅनेजमेंट बद्दल दांडगा अनुभव आहे. क्रू शेड्युलिंग-असिस्टंट मॅनेजर-एक्झिक्युटिव्ह, कॉकपिट क्रू शेड्युलिंग असा त्यांचा 27 वर्षांचा मोठा अनुभव असतानाही त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच त्यांना मागच्या वर्षी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'IMPACCT चॅम्पियन' आणि 'पथदर्शक' या पुरस्काराने सन्मानित केले होते. मात्र ज्यादिवशी हा अपघात झाला त्यादिवशी पिंकी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पायलट आणि क्रू मेम्बर्सच्या जोड्या बनवण्यात आल्या होत्या. ज्या योग्य परवानगीशिवाय बनवण्यात आलेल्या जोड्या होत्या. तसेच प्रत्येक टेकऑफपूर्वी सर्व पायलट आणि क्रू मेम्बर्सला आवश्यक ती विश्रांती दिली गेली पाहिजे, ती त्यांना दिली गेली नव्हती. त्याचबरोबर लायसेन्स स्टॅंडर्डकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. पिंकी मित्तल यांच्याकडून अशा अनेकदा चुका झाल्या होत्या. ड्युटीचे वेळापत्रक आणि सुरक्षेची तपासणी यामध्ये पिंकी मित्तल यांच्याकडून वारंवार चुका होत होत्या. याच कारणांमुळे इतक्या वर्षांचा अनुभव असूनही त्यांच्याकडून झालेल्या चुका या अक्षम्य होत्या. याच कारणांमुळे पिंकी मित्तल यांना निलंबित करण्यात आले.