SP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
SP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? रोहित पवारांचा सरकारला थेट सवालSP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? रोहित पवारांचा सरकारला थेट सवाल

SP NCP Jan Akrosh Morcha : शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? रोहित पवारांचा सरकारला थेट सवाल

रोहित पवारांचा सवाल: शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? सरकारच्या आश्वासनांची पूर्तता नाही.#
Published by :
Riddhi Vanne
Published on

नाशिकच्या गोल क्लब मौदानापासून ते जिल्ह्याधिकारी कार्यालयापर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा जन आक्रोश मोर्चा निघाला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन शरद पवारांची राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या मोर्च्यात सुप्रिया सुळे तसेच शशिकांत शिंदे देखील सहभागी झालेले आहेत. तसेच अनेक शेतकरी मोर्चात सहभागी आहेत. याचसंदर्भात रोहित पवारांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे.

त्यावेळी ते म्हणाले की, "ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेस या सरकारने आश्वासने दिली होती. आम्ही कर्जमाफी देऊ, भावातंर योजना आणू. आम्ही शेतकऱ्यांचा जीएसटी हा पुर्णपणे कमी करु आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. आम्ही युवकांना नोकऱ्या देऊ, अशी आश्वासने या सरकारने दिली होती. पंरतू यापैंकी कोणतीही मागणी सरकारने पुर्ण होत नसताना दिसत आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे."

पुढे ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या कांद्यांला, दुधाला, कपाशी, सोयाबीनला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांच्यावतीने पवारसाहेब आणि आमचा पक्ष आणि शेतकरी कष्टकरी रस्त्यांवर उरले आहेत. मोठ्या संख्येने नाशिकमध्ये मोर्च्यांची आता सुरुवात झालेली आहे. हा मोर्चा प्रत्येक भागामध्ये होईल, इथेच थांबणार नाही."

शेतकऱ्यांच्या आत्महत्येंवर रोहित पवार म्हणाले की,

" राज्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या मुद्दा मोठी चिंता दिवसाला आठ आत्महत्या होत आहेत. कर्जमाफी कधी करणार आम्ही जेव्हा सरकारला विचारलं, त्यावेळेस सरकार म्हटले आहे की, योग्य वेळेस देऊ. दिवसाला आठ आत्महत्या आणि तुम्ही निवडणुकांसाठी थांबणार असताल तर पाच वर्षात 14000 आत्महत्या मग त्याला कोण जबाबदार? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com