Krishna River
Krishna RiverTeam Lokshahi

कृष्णेच्या पात्रातील लाखो माश्यांचे मारेकरी कोण ?

सांगलीच्या कृष्णा नदीत गेल्या दोन दिवसांपासून माशांच्या मृत्यूचा थैमान सुरूच आहे.
Published by :
shweta walge

संजय देसाई|सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीत गेल्या दोन दिवसांपासून माशांच्या मृत्यूचा थैमान सुरूच आहे. नदीकाठी हजारो मृत माशांचा खच जागोजागी पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या माशांपासून अगदी भले मोठे मासे नदीच्या पात्रात मृत आणि तडफडणाऱ्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत. प्रदूषण महामंडळाने देखील याची गंभीर दाखल घेत नदीपात्रातल्या पाण्याचे नमुने घेत, तर कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रासायनिक मिश्रीत पाण्याने की अन्य कशाने या माशांचा मृत्यू झाला आहे, त्याचा शोध सुरू झालाय. पण या लाखो माशांचे मारेकरी कोण ? हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

संततधार पाऊस,कोयना धरणातून सोडण्यात आलेले पाणी त्यामुळे कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. पाण्याची पातळी दररोज वाढत आहे. लालसर असणाऱ्या या पाण्यात मात्र आता लाखो माश्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पलूस तालुक्यातल्या आमणापूरपासून सांगलीच्या हरिपूर संगमा पर्यंत जागोजागी मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. तर हजारो मासे हे अजूनही या कृष्णाच्या पात्रात तडफडत असल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे. हे मासे घेऊन जाण्यासाठी नदीकाठी झुंबड देखील उडत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये माशांच्या मृत्यूचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. साखर कारखान्यांच्याकडून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे माशांच्या मृत्यू घडल्याचा आरोप झाला होता. मात्र तसे कोणतेच पुरावे मिळाले नसल्याने या कारखान्यांवर कारवाई झाली नाही. पण माशांच्या मृत्यूचे प्रकार वाढतच आहेत. नदीच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढली की, अशा प्रकारे माशांच्या मृत्यूचे प्रकार समोर येतात,आता देखील पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि लाखो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. हा प्रकार होत असताना प्रदूषण महामंडळ काय करतय ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Krishna River
अरे, देवा संकट काही थांबेना... बीडमध्ये पावसाने फिरवली पाठ तर गोगलगाई उठल्या शेतकऱ्यांच्या जीवावर...!

प्रदूषण महामंडळाकडून प्राथमिक तपासात कारखान्याचा कोणतंही पाणी नदीपात्रात मिसळलं नसल्याचा स्पष्ट केले आहे. त्यामुळे या माशांचे मारेकरी कोण ? या माशांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे.त्यामुळे पाणी तपासणी आणि मत्स्य विभागाच्या अहवालानंतर याचे कारण समोर येणार आहे.पण वारंवार माशांच्या मृत्यूच्या घडणाऱ्या घटना पाहता,त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे,अन्यथा कृष्णानदी पात्रातले जलचर कायमचे नष्ट होतील,

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com