Sanjay Raut On Ind-Pak Match : 'पाकिस्तानी खेळाडूची बंदुकीची ॲक्शन कुणासाठी?' राऊतांचा सरकारला सवाल
थोडक्यात
भारत पाकिस्तान सामना पाहता यावा म्हणून मोदी आठऐवजी पाच वाजता बोलले आहेत.
खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली.
काल एका खेळाडूने गोळ्या झाडण्याची अॅक्शन केली ही नेमकी कुणासाठी असा सवाल देखील राऊतांनी उपस्थितीत केला आहे.
भारत पाकिस्तान सामना पाहता यावा म्हणून मोदी आठऐवजी पाच वाजता बोलले आहेत. खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली आहे. काल एका खेळाडूने गोळ्या झाडण्याची अॅक्शन केली ही नेमकी कुणासाठी असा सवाल देखील राऊतांनी उपस्थितीत केला आहे. भाजपाची लोक पाकिस्तानचा निषेध करण्यास घाबरतात अशी खोचक टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "एरवी ते आठ वाजता बोलतात प्रधानमंत्री आठ वाजता त्यांचे आठ ही देशाला धक्का देण्याची वेळ आहे. काल पाच वाजता का बोलले काल ते पाच वाजता यासाठी बोलले की, देशाला भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पहावा ही व्यवस्था किती महान राष्ट्रभक्त आहेत. आठ वाजता क्रिकेट सामना अंध भक्तांना पाहता यावा भाजपा समर्थकांना पाहता यावा म्हणून काल प्रधानमंत्री यांनी पाच वाजता जीएसटीची घोषणा केली. क्रिकेटच्या मैदानावर ए के 47 हातामध्ये घेतल्यासारखी बॅट घेऊन धडधड गोळ्या मारत आहेत अशी जी ऍक्शन केली, ती कोणासाठी आणि का?" असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला आहे.
पुढे ते म्हणाले की, "त्याने दाखवलं अशाच प्रकारे एके 47 चा वापर करून पाकिस्तानी यांनी अतिरेकी यांनी पहालगांमध्ये तुमच्या 26 निरप्राद लोकांना ठार केलं. त्यांनी प्रत्येकात्मक रित्या दाखवला आणि जयशहासह संपूर्ण भारतीय संघ हे थंडपणे पाहत होता."