पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? 'या' नावांची होतेय चर्चा
Admin

पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? 'या' नावांची होतेय चर्चा

पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार?
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे लोकसभा पोटनिवडणूक कोण लढवणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल याची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

येत्या सहा महिन्यात ही निवडणूक होणार असल्याची माहिती मिळत आहे.  खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची निवडणुक लागल्यास भाजपकडून उमेदवार कोण असेल यासाठी नावांची चाचपणी सुरु झाली आहे.

यात स्वरदा बापट , मुरलीधर मोहोळ की संजय काकडे या नावांची चाचपणी झाल्याची सुत्रांची माहिती आहे. भाजपकडून पुणे लोकसभा निवडणुकीत बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. तसेच माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत.  काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com