ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #BoycottBharatMatrimony? वाचा कारण
Admin

ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #BoycottBharatMatrimony? वाचा कारण

वैवाहिक वेबसाइट भारत मॅट्रिमोनीने होळीच्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

वैवाहिक वेबसाइट भारत मॅट्रिमोनीने होळीच्या दिवशी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. या वेबसाईटवर होळीच्या दिवशी केलेल्या जाहिरातीबाबत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे आणि त्याला हिंदुविरोधी म्हटले आहे. ही जाहिरात काही वेळातच व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर प्रचंड संताप निर्माण झाला. यानंतर ट्विटरवर #BoycottBharatMatrimony ट्रेंड होत आहे.

या जाहिरातीत एक महिला तिच्या चेहऱ्याचा रंग धुताना दाखवली आहे. जसजसे रंग धुतले जातात तसतसे त्या महिलेचा उदास चेहरा दिसतो आणि शेवटी चेहऱ्यावरून हात काढतो तेव्हा अनेक जखमा दिसतात. ही जाहिरात होळीच्या दिवशी महिलांच्या छेडछाडीकडे बोट दाखवत आहे. याला कॅप्शन देण्यात आले आहे की, 'छळामुळे झालेल्या आघातानंतर अनेक महिलांनी होळी खेळणे बंद केले आहे. आयुष्य किती कठीण झाले आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा. असे त्या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांचा संताप उसळला असून ते याला हिंदुविरोधी जाहिरात म्हणत आहेत. यासह ट्विटरवर #BoycottBharatMatrimony ट्रेंडिंग सुरू झाले आहे. लोक यावर कमेंट करत आहेत. मात्र यासर्व प्रकरणावर BharatMatrimonyकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com