Vasubaras 2025 : वसूबारसच्या दिवशी गायची पूजा का केली जाते?
Vasubaras 2025 : वसूबारसच्या दिवशी गायची पूजा का केली जाते?, पूजेची साहित्य जाणून घ्या...Vasubaras 2025 : वसूबारसच्या दिवशी गायची पूजा का केली जाते?, पूजेची साहित्य जाणून घ्या...

Vasubaras 2025 : वसूबारसच्या दिवशी गायची पूजा का केली जाते?, पूजेची साहित्य जाणून घ्या...

Vasubaras 2025 : दिवाळीचा पहिला आणि पारंपरिक सण मानल्या जाणाऱ्या वसुबारसचा उत्सव यंदा १७ ऑक्टोबर 2025 , शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराघरांत श्रद्धा आणि भक्तीभावाने गाई आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Vasubaras 2025 : दिवाळीचा पहिला आणि पारंपरिक सण मानल्या जाणाऱ्या वसुबारसचा उत्सव यंदा १७ ऑक्टोबर 2025 , शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी घराघरांत श्रद्धा आणि भक्तीभावाने गाई आणि तिच्या वासराचे पूजन केले जाते. हिंदू संस्कृतीत गाईला ‘गौमाता’ मानले जाते आणि तिच्या पूजनाने सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभते, असा विश्वास आहे.

वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असेही म्हटले जाते. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी, म्हणजेच आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारावा दिवस. उत्तर भारतातही हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. दिवाळीच्या आनंदोत्सवाची सुरुवात या दिवशी होते. यंदा द्वादशी तिथी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:34वाजता सुरू होऊन 18 ऑक्टोबरच्या पहाटे 4:41 वाजता संपेल. गाईच्या पूजनासाठी सायंकाळी 4:30ते 6:00या वेळेत शुभ मुहूर्त असल्याचे पंचांगानुसार सांगण्यात आले आहे.

ज्यांच्या घरी गाई आणि वासरे असतात, त्या कुटुंबांत विशेष सजावट केली जाते. गाईला अंघोळ घालून तिच्या अंगावर हळद, कुंकू व अक्षता लावल्या जातात. फुलांची माळ घालून ओवाळणी केली जाते. वासरालाही गोड धान्य, गवत आणि तुपकट पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. यानंतर ‘गोवत्स व्रत कथा’ वाचण्याची किंवा ऐकण्याची प्रथा आहे. स्त्रिया या दिवशी उपवास करतात. अनेक ठिकाणी गहू व मूग खाणे टाळले जाते. उपवास सोडल्यानंतर बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगांची भाजी खाल्ली जाते. अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढण्याची सुरुवातही याच दिवसापासून होते.

वसुबारस सणामागे धार्मिकदृष्ट्या एक गहन महत्त्व आहे. धर्मशास्त्रांनुसार गाईत ३३ कोटी देवता वास करतात. त्यामुळे तिच्या पूजनाने सर्व देवतांचे पूजन होते. या दिवशी गाईची सेवा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्याची वृद्धी होते, असा विश्वास आहे. शेतीप्रधान संस्कृती असलेल्या भारतात गाईला केवळ पवित्र जनावर म्हणून नव्हे, तर कुटुंबाचा एक भाग मानले गेले आहे. त्यामुळे वसुबारसचा सण हा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे.

या सणाच्या निमित्ताने निसर्ग, प्राणी आणि मानव यांचा परस्परसंबंध जपण्याचा संदेश मिळतो. गोमातेच्या पूजनातून भक्तिभाव, कृतज्ञता आणि निसर्गाशी नाते दृढ करण्याचा सुंदर संकल्प साकार होतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com