कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना तिकीट का दिलं नाही;  चंद्रकांत पाटील म्हणाले...
Admin

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबियांना तिकीट का दिलं नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले...

भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका माध्यमाच्या मुलाखतीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना तिकीट का दिलं नाही याचा गौप्यस्फोट केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका माध्यमाच्या मुलाखतीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना तिकीट का दिलं नाही याचा गौप्यस्फोट केला आहे.

त्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले, आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत वेळ द्यावा लागला. त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक 'एक्जिस्टन्स' कमी झाला होता असं ते म्हणाले.

यावर मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आणि भाजपचे प्रवक्ते कुणाल टिळक यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आई च्या कामाला निग्लेट करु नका. मतदारसंघात आई आजारी असताना सुद्धा तिचा संपर्क कमी झाला नव्हता, असं कुणाल टिळक म्हणाले आहेत. मात्र या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत वाढ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com