Dombivli
Dombivli

Dombivli : डोंबिवलीत आज क्रीडा संकुलाचं भूमीपूजन आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण; उपमुख्यमंत्री शिंदे, रवींद्र चव्हाण कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार?

डोंबिवलीत आज क्रीडा संकुलाचं भूमीपूजन आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरणाचा कार्यक्रम आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Dombivli) डोंबिवलीत आज क्रीडा संकुलाचं भूमीपूजन आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे, रवींद्र चव्हाण कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत झालेल्या पक्ष प्रवेशावरुन वाद झाला होता त्यामुळे आता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण एकत्र उपस्थिती लावतात का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

डोंबिवलीतील 2 कार्यक्रमांना रवींद्र चव्हाण उपस्थिती लावणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Summery

  • आज उपमुख्यमंत्री शिंदे, रवींद्र चव्हाण एकत्र येणार ?

  • डोंबिवलीत 2 कार्यक्रमांना रवींद्र चव्हाण लावणार उपस्थिती?

  • क्रीडा संकुलाचं भूमीपूजन आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com