नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार? शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार
Admin

नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार? शरद पवार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार

नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागालँडमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपसोबत जाण्यावरुन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

इतर छोट्या पक्षांनीही एनडीपीपी-भाजप प्रणित सरकारला पाठिंबा जाहीर करुन टाकला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा कल सत्तेत सहभागी होण्याकडे आहे.नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं सत्तेत जायचा निर्णय घेतल्यास सर्वच पक्ष सरकारमध्ये सामील होतील. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com