Parth Pawar
Parth Pawar

Parth Pawar : सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Parth Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत असून एनसीपी कोअर टीम आणि मित्र पक्ष भाजपा शिवसेना यांच्या सहमतीने पार्थ पवार यांची राज्यसभेच्या जागेवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जय पवार ऐवजी पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

  • सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?

  • पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com