Sameer Wankhede, Kranti Redkar
Sameer Wankhede, Kranti RedkarTeam Lokshahi

समीर वानखेडें राजकारणात येणार? वाशिमच्या पेपरमध्ये दिवाळीची जाहिरात

वाशीम जिल्ह्यातील वरुड तोफा गावाचे मूळ रहिवाशी असलेले समीर वानखेडे व त्यांच्या पत्नी अभेनेत्री क्रांती रेडकर यांची जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एका जाहिरात एका दैनिकाच्या स्थानिक आवृत्तीत प्रकाशित झाली आहे.
Published by :
shweta walge

गोपाल व्यास, वाशिम : वाशीम जिल्ह्यातील वरुड तोफा गावाचे मूळ रहिवाशी असलेले आय आर एस अधिकारी समीर वानखेडे व त्यांच्या पत्नी अभेनेत्री क्रांती रेडकर यांची जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देणारी एका जाहिरात आज एका दैनिकाच्या स्थानिक आवृत्तीत प्रकाशित झाली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंना राजकीय वेध तर लागले नाहीत अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.

माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या जात अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्या नंतर वानखेडे यांनी आपल्या मूळ गावाशी संबंध जोडत आपले कुटुंबीय अजूनही वरुड तोफा गावात राहत असल्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले होते. विशेषतः वरुड तोफा गावच्या नागरिकांनी वानखेडेंच्या समर्थनार्थ मोर्चाही काढला होता. मध्यंतरी समीर वानखेडे हे आपल्या मूळ गावी तीन दिवस मुक्कामीही आले होते. जात पडताळणी समितीने वानखेडे यांचे महार जातीचे जात वैधता प्रमाणपत्र वैध ठरवल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता त्यांनी दिलेल्या दिवाळीच्या शुभेच्छाने ते राजकारणात येणार का अशी चर्चा होत आहे.

कारण वाशीम जिल्ह्यातीस वाशिम मंगरुळपीर हा मतदार संघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. येथून भाजपचे लखन मलिक हे सातत्याने निवडून येत आहेत. हा मतदार संघ भाजपचा गढ आहे. समीर वानखेडेंनचा जात प्रमानपत्राचा अडथळा दूर झाल्याने ते येथून निवडणूक लढवतील का? अशी जोरदार चर्चा आहे.

Sameer Wankhede, Kranti Redkar
संगमेश्वरातील फुणगुस, कोंडये गाव १५ तास अंधारात,नागरिकांचा संताप
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com