अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांकडे परतणार?

अजित पवारांचे काही आमदार शरद पवारांकडे परतणार?

लोकसभेचा निकाल जाहीर झाला. या लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभेचा निकाल जाहीर झाला. या लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी गुरुवारी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित राहिले होते. त्या आमदारांच्या अनुपस्थितीवरुन आता अनेक चर्चा रंगल्या आहेत.

विधानसभेचे 42 आणि विधान परिषदेचे 5 आमदार हजर राहणं अपेक्षित होते मात्र 6 आमदार उपस्थित नव्हते. यावरुन आता पक्षाचा कोणताही आमदार फुटणार नाही. असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com