RBIचा मोठा निर्णय : ATM मधून पैसे काढणे महागणार,

RBIचा मोठा निर्णय : ATM मधून पैसे काढणे महागणार,

RBIच्या निर्णयामुळे आता एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. 1 मे 2025 पासून इंटरचेंज फी वाढवली जाणार असून, अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढणे आता महागणार असून खिशाला कात्री लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने एटीएम इंटरचेंट फी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे वाढीव शुल्क येत्या1 मे 2025 पासून लागू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमित बदल करण्यात आला आहे. आता एका मर्यादेपलीकडे एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर अतिरिक्त कर भरावा लागणार आहे.

किती जास्त कर भरावा लागणार?

ग्राहकांनी आता इतर नेटवर्क बॅंकेतील एटीएममधून पैसे काढल्यास त्यांना 17 रुपये अतिरिक्त कर भरावे लागत होते. आता 1 मे पासून 19 रुपये भरावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे इतर कोणत्याही बॅंकेच्या एटीएममधून बॅंकेच्या खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी 6 रुपये शुल्क लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com