संयम ठेवा, आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच मागे सरत नसतो: मनोज जरांगे पाटील

संयम ठेवा, आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच मागे सरत नसतो: मनोज जरांगे पाटील

महाराष्ट्राच्या मातीत शोर्य आहे आणि हेच शौर्य मराठ्याच्या तलवारीच्या पात्याला लागल की इतिहास घडतो हे देशाला माहीत आहे. कोणीही कीतीही जंग जंग पछाडुदे मराठा आरक्षणाची लढाई मी जिकंणार
Published by :
shweta walge

मेढा : महाराष्ट्राच्या मातीत शोर्य आहे आणि हेच शौर्य मराठ्याच्या तलवारीच्या पात्याला लागल की इतिहास घडतो हे देशाला माहीत आहे. कोणीही कीतीही जंग जंग पछाडुदे मराठा आरक्षणाची लढाई मी जिकंणार. महाराष्ट्रातील मराठ्यानी संयम ठेवावा. मराठ्याच्या मुखाशी आरक्षणाचा घास आलेला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरत नसतो अशी ग्वाही मेढा येथे आयोजीत सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

यावेळी ते म्हणाले, कुणबी हा शब्द शेतात राबणारा मराठा म्हणुन महाराष्ट्रात लागु झाला आहे. वर्षानवर्ष शेतात राबणारा मराठा समाज आर्थीक दृष्ट्या दुर्बल असताना त्या मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवायच काम कोणी केल याचा विचार मराठ्यानी करावा. वर्षानुवर्ष नेत्याची पाय चाटत मराठ्यानी स्वाभिमान घाण ठेवला. मात्र आता मराठा आपल आरक्षण घेणारच. कोणीही कीतीही जातीय दंगल करवण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यानी ती भडकवू द्यायची नाही ही जवाबदारी मराठ्याच्या खाद्यावर आहे, असे भावनीकअवाहन यावेळे जरांगे पाटील यांनी केले.

मराठ्याना दगलीत अडकवुन कायदा न होवुन देणे हा काही विघातक शक्तीचा डाव वेळीच मराठ्यानी ओळखुन सयंम पाळा मी आपल्याला आरक्षण मिळवुन देतो असे अवाहन करत. मराठा आरक्षणाची लढाई जिकणारच असा विश्वास व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी मेढा येथील सभेत व्यक्त करत. मराठा आरक्षणा बाबत झालेल्या सभेवरुन मेढ्यात सकल मराठा समाजाकडुन चैतन्य निर्माण झाले आहे.

दरम्यान यावेळी मनोज जरांगे पाटलांना सकल मराठा समाजाकडुन तलवार देत त्याचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला. मेढा नगरी भगवामय होवुन झालेला माहोल मराठामय झाल्याच चित्र मेढ्यात झालेल्या सभेवरुन लपुन राहीले नाही. “एक मराठा लाख मराठा “ च्या घोषणेने मेढ्याचा आसंमत दुमदुमुन गेला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com