चीनच्या सीमेवर 'स्त्री शक्ती' ची कामगिरी; भारताचं करतायत रक्षण, सुखोई 30 मधून घेतलं उड्डाण
Admin

चीनच्या सीमेवर 'स्त्री शक्ती' ची कामगिरी; भारताचं करतायत रक्षण, सुखोई 30 मधून घेतलं उड्डाण

आज कोणतेही क्षेत्र असो महिला कोणत्यात क्षेत्रात मागे नाही आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत असतात. असेच सैन्य दलातही 'स्त्री शक्ती'चं आहे. भारत-चीन सीमेवर भारतीय महिला वैमानिक विमान आणि हेलिकॉप्टर उडवत देशाचं रक्षण करतात. मंगळवारी आसाममध्ये तीन महिला वैमानिकांनी लढाऊ विमानं उडवलं आणि शत्रूंना आपली ताकद दाखवून दिली.
Published by :
Siddhi Naringrekar

सध्या हवाई दलात 1300 महिला अधिकारी कार्यरत आहेत.हवाई दलातील महिला वैमानिकही देशाच्या संरक्षणासाठी पूर्ण तयारीसह सज्ज आहेत. आसामजवळील भारत-चीन सीमेवर फायटर जेट उडवत महिला पायलट देशाचं संरक्षण करत आहेत.अवनी चतुर्वेदी आणि भावना कंठ यांच्यासह तीन महिलांना फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळाल्यावर भारतीय वायुसेनेने प्रथमच महिलांना हवाई दलात प्रवेश दिला. त्यानंतर भावना कंठ मिग-21 मधून उड्डाण करणाऱ्या पहिली महिला वैमानिक ठरली. त्यानंतर शिवांगी सिंह राफेल विमान उडवरी महिला पायलट ठरली आहे.

महिला वैमानिक अरुणाचल प्रदेश-आसामच्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर उडवत आहेत. मंगळवारी सुखोई-30 फायटर जेटमधून महिला वैमानिकांनी उड्डण केलं. याचे फोटो समोर आले आहेत. आसाममधील तेजपूर येथील पूर्वी सेक्टरमधील फॉरवर्ड बेसवरून यांनी सुखोई-30मधूल उड्डाण केलं. फ्लाईट लेफ्टनंट तेजस्वी देशातील एकमेव महिला वैमानिक आहे. याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने सोशल मिडियावर पोस्ट करत दिली आहे.

'स्त्रिया बंधनातून मुक्त होतं आहेत. हुशार महिला ज्यांनी मर्यादा तोडली आणि आमची स्वप्ने पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा केला. महिलांनी फायटर जेट उडवणे नवीन गोष्ट नाही. हवाई दलात पुरुष आणि महिलांसह प्रत्येकजण परिश्रम करतो आणि त्यांना समान प्रशिक्षण दिले जाते. आम्ही समान पातळीवर आहोत. आमचे पायलट कोणत्याही प्रसंगाला प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.' असे Su-30 MKI वेपन ऑपरेटर फ्लाइट लेफ्टनंट तेजस्वी यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com