Viral Video : 'त्या' महिलेनं चिमुकलीसमोर गैरवर्तन करणाऱ्याला कानशिलात लगावली; कारण समजताचं इतर प्रवासीदेखील संतापले
गर्दीच्या ठिकाणी वावरताना काही लोक मुद्दाम इतरांचा गैरफायदा घेतात. विशेषतः सार्वजनिक वाहतुकीत महिलांवर आणि लहान मुलींवर होणारे गैरवर्तन हे गंभीर प्रश्न निर्माण करतं. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जिथे ट्रेनमध्ये एका महिलेने चिमुकलीसमोर चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, एका ट्रेनमध्ये अप्पर सीटवर एक लहान मुलगी बसलेली असते आणि तिच्यासमोर एक तरुण अर्धवट झोपलेल्या अवस्थेत, पाय विचित्र पद्धतीने पसरवत बसतो. काही वेळाने तो सीटवरून खाली उतरतो आणि समोर बसलेल्या महिलेला म्हणतो, “काकू, एक मिनिट थांबा, मला खाली जाऊ द्या.” त्यावर महिला ताडकन प्रतिक्रीया देत म्हणते, “जर तू त्या मुलीला हात लावलास, तर मी तुला इथेच मारून टाकीन.” यानंतर ती आपल्या हातातील घड्याळ काढते आणि त्या तरुणाला कानाखाली मारते.
यावेळी ट्रेनमधील इतर प्रवाशांनीही महिलेच्या कृतीचं समर्थन केलं. एक महिला प्रवासी म्हणते की, “अरे तो मरून जाईल.” त्यावर संतप्त महिला म्हणते, “तो मेला तरी चालेल. अशा पद्धतीने लहान मुलीसमोर वागणं हे गुन्ह्यासारखं आहे. आज जे गुन्हे घडतात ते अशा लोकांमुळेच.”
या व्हिडीओवर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी महिलेचं समर्थन करत "अशा विकृतांना वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे" ,असे मत व्यक्त केलं आहे. “Public transport मध्ये महिलांनी आणि मुलींनी सुरक्षिततेसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे,” अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.