कुस्तीपटूंचा आज अल्टिमेटम संपणार; काय घेणार निर्णय?

कुस्तीपटूंचा आज अल्टिमेटम संपणार; काय घेणार निर्णय?

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी दिल्लीत कुस्तीपटू आंदोलन करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. एका माध्यमाशी बोलताना कुस्तीपटू म्हणाले की, आमची केंद्रीय गृहमंत्र्यांशी बैठक झाली. याहून जास्त माहिती मी देऊ शकत नाही असे ते म्हणाले. ही बैठक तब्बल दोन तास चालली अशी माहिती मिळत आहे.

आज कुस्तीपटूंचा अल्टिमेटम संपत आहे. त्यामुळे आता कुस्तीपटू नेमका कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com