Digestive System : चुकीचा आहार, जंकफूड, बदलती जीवनशैली करतेय तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम; जाणून 'घ्या' त्याची कारणं
सामान्यतः आपली दिनचर्या, आपल्या सवयी, आपला आहार या त्रिसुत्रीवर आपले आरोग्य निगडित असते. आपल्या पोटातूनच आपल्या आजाराचे रस्ते जात असतात. भारतासारख्या देशात सध्या इतर किरकोळ आजारांबरोबरच आता पचनसंस्थेशी निगडित आजारांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. याची अनेक कारणे आहेत. मात्र जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल जर केला, तर या आजारांवर मात करता येते.
साधरणतः आपण काहीही जास्त प्रमाणात खाल्लं किंवा काही असे खाल्ले जे आपल्या शरिरास हानिकारक आहे, अशा परिस्तिथीमध्ये अपचन हा आजार होतो. मात्र हा छोटा वाटणारा आजार कधीकधी मोठा आजारही होऊ शकतो. यानुसार हा आजार मोठा होऊन त्यापासून आतड्यांचे आजार कधी आतड्यांचा कँसरही होऊ शकतो. एका सर्वेक्षणानुसार भारतात याचे प्रमाण ४. २ असून १ लाख लोकांमागे ४० ते ५० लोकांना हा आजार होत आहे. हे आजार गंभीर स्वरूपाचे असून त्यांच्या उपचारांचा खर्च न परवडणारा आहे. आजकालच्या अन्न पदार्थात भेसळ मोठ्या प्रमाणावर होत असे. त्याचा थेट परिणाम हा आपल्या पचनसंस्थेवर होत असतो. त्याचबरोबर आजच्या २१ व्या शतकात फास्ट फूडचा जमाना आलेला आहे. त्या पदार्थामध्ये वापरलेले जिन्नस हे आपल्या पोटाला परिणामी आपल्या पचनसंस्थेवर मोठा आघात करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याचाही मोठा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर पाहायला मिळतो.
त्याचबरोबर जठरोगविषयक समस्या मुळात पचनसंस्थेशी संबंधित विकार आहेत. कमी फायबरयुक्त आहार, तणाव, अन्न असहिष्णुता, मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन इत्यादी काही कारणांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण होतात. बहुतेक गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या तितक्या भयानक नसतात आणि त्या मुख्यतः योग्य औषधोपचार, सकस अन्न, जीवनशैलीच्या सवयींमध्ये बदल करून बरे होऊ शकतात. तथापि, पोटाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष न करणे आणि कोणतीही दीर्घकाळ टिकणारी गुंतागुंत टाळण्यासाठी या चिंताजनक लक्षणांचे वेळेत निदान करणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर आजची जीवनशैली ही शारीरिक हालचालीच्या कामांपेक्षा केवळ बसून काम करण्यावर जास्त भर देते. त्यामुळेही पचनाचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत.
अशा पचनसंस्थेशी निगडित आजारांपासून आराम मिळवण्यासाठी जीवनशैलीत बदल करू शकता आणि काळजीपूर्वक खाण्याच्या सवयींद्वारे हा आजार आपल्यापासून दूर ठेऊ शकता. मात्र यासाठी आपल्या जीवनात योग्य तो बदल करणे आवश्यक आहे.