सर्वांना मिळवून घेतलं तर आणखी पक्ष वाढेल; यशोमती ठाकूर यांची नाना पटोलेंवर सूचक प्रतिक्रिया

सर्वांना मिळवून घेतलं तर आणखी पक्ष वाढेल; यशोमती ठाकूर यांची नाना पटोलेंवर सूचक प्रतिक्रिया

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचा एक गट पक्षश्रेष्ठींकडे गेला असून नाना पटोले यांना अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करत आहे.

सूरज दहाट, अमरावती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचा एक गट पक्षश्रेष्ठींकडे गेला असून नाना पटोले यांना अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी करत आहे. यावर माजी महिला व बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली.

प्रदेशाध्यक्ष श्रेष्ठ असतो त्याबाबत आपल्याला बोलायचे नाही मात्र येवढेच आहे की सर्वांना मिळवून घेतले तर पक्षाचा आणखी परफॉर्मन्स वाढेल अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सध्या काँग्रेसच्या अंतर्गत वादावर दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com