Yavatmal Child Death : खळबळजनक! यवतमाळमध्ये सर्दी- खोकल्याच्या औषधाने घेतला चिमुकल्याचा जीव?
Cough Syrup Death : देशभरात कफ सिरपसंबंधी सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशमध्ये काही लहान मुलांचा मृत्यू या औषधामुळे झाला असून, आता यवतमाळमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूची शक्यता कफ सिरपशी जोडली जात आहे.
घटना कशी घडली?
यवतमाळमधील शिवम (6) हा मुलगा 4 ऑक्टोबर रोजी सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त झाला. त्याच्या कुटुंबाने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला काही औषधे दिली आणि त्याला सुरुवातीला आराम वाटला. पण 6 तारखेला त्याची प्रकृती पुन्हा खालावली. त्याला परत रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले.
शिवमच्या कुटुंबाने सांगितल्या नुसार,
शिवमच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याला दिलेले औषध आणि त्यानंतर अचानक झालेले बेशुद्ध होणे हे चिंतेचे कारण बनले आहेत. शव विच्छेदन आणि औषध तपासणी अहवाल आल्यानंतरच त्याचा मृत्यू कसा झाला, हे स्पष्ट होईल. मुलाच्या मृत्यूप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने त्या औषधांचे नमुने जप्त केले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. औषधांमुळे मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे. म्हणूनच, सरकारने या औषधांचा वापर तात्पुरता थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी सांगितले की, संबंधित औषधांचा तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे, या औषधांच्या वापरावर कडक नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.