Yavatmal girl died due to no ventilator
Yavatmal girl died due to no ventilatorTeam Lokshahi

यवतमाळमधील 17 वर्षीय तरुणीचा व्हेंटिलेटरअभावी मृत्यू; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह...

अंबु बॅगद्वारे कृत्रिम श्वास पुरवठा करून तिला जगवण्यासाठी पालकांनी 24 तास आटापिटा केला.

संजय राठोड | यवतमाळ: आर्णी तालुक्यातील एका युवतीचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये व्हेंटिलेटरअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबु बॅगद्वारे कृत्रिम श्वास पुरवठा करून तिला जगवण्यासाठी पालकांनी 24 तास आटापिटा केला. परंतु, त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर मुलीने व्हेंटिलेटर अभावी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वैष्णवी राजू बागेश्वर, असे 17 वर्षीय मृत मुलीचे नाव आहे. सदर कुटुंब गरीब असून, मुलगी आजारी पडल्यावर तिला यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूरला रेफर करण्यात आले.

Yavatmal girl died due to no ventilator
दौलताबाद किल्ल्याच्या नामांतरणाविषयी पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढांचं मोठं वक्तव्य

मृत मुलीच्या घरच्यांचे आरोप काय?

  • सुरुवातीला डॉक्टरांनी तपासणी करण्यासाठी टाळाटाळ केली

  • आयसीयूमध्ये उपचार करणे आवश्यक असताना साध्या वार्डात ठेवण्यात आले

  • त्याठिकाणी असलेले दोन्ही व्हेंटिलेटर बंद असल्याने पालकांच्या हातात अंबु बॅग देऊन कृत्रिम श्वास देण्याचा सल्ला दिला

  • अखेर पर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले नाही

    तसंच, हे आरोप करत असतानाच पालकांनी ही अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com