आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात 'यलो अलर्ट'

आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात 'यलो अलर्ट'

परतीच्या पावसानं राज्यातल धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. नदी - नाले भरले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

परतीच्या पावसानं राज्यातल धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. नदी - नाले भरले आहेत. शेती पिकांचं मोठं प्रमाणात या पावसानं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण आठवड्यात विदर्भात कमीअधिक प्रमाणात पावसाचा खेळ सुरुच राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतावर सध्या ढगांची दाटी झाली आहे.

शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे.कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. वीजांच्या गडगडाटांसह पाऊस झाला. त्यामुळं वाहतुकीवरही परिणाम झाला. कोल्हापूर जिल्ह्याला 13 ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे परिसरात देखील पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com