Yogesh Kadam and Bharat Gogawle
Yogesh Kadam and Bharat GogawleTeam Lokshahi

मंत्रिमंडळ विस्तारासाठी योगेश कदम यांचंही नाव चर्चेत

दिवाळीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे स्पष्ट संकेत उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
Published by :
Vikrant Shinde

निसार शेख, चिपळूण

दिवाळीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे स्पष्ट संकेत उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याचं पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचाल देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे आमदाराने मोर्चे बांधणी सुरू केले असून ह्यावेळी शिंदे गटाचे प्रतोद आणि महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्यासह दापोली खेडचे आमदार योगेश कदम यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.

सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह २० मंत्री आहेत त्यात भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ९ मंत्री असून विस्ताराच्या दुसऱ्या टप्यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ४ आमदार यांना मंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे शिंदे गट आणि भाजप यामधील इच्छुकानी त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे कोणाचा समावेश होणार याची चर्चा सुरू झाली आहे शिंदे गटात अनेक आमदार इच्छुक आहेत पहिल्या विस्ताराच्या वेळी शिंदे गटाचे प्रतोद आ. भरत गोगावले यांचे ऐनवेळी नाव कट झाले होते यावेळी त्यांना निश्चित संधी मिळेल असे बोलले जाते तर रत्नागिरी जिल्हातील दापोली खेड मतदार संघ आमदार योगेश कदम यांनाही मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे दुसऱ्या मंत्री मंडळ विस्तारात कोकणला दोन मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com