घरावर झेंडा फडकावणार असाल, तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

घरावर झेंडा फडकावणार असाल, तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असे आवाहन केले आहे. मात्र, घरी झेंडा फडकावण्याचेही काही नियम आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असे आवाहन केले आहे. मात्र, घरी झेंडा फडकावण्याचेही काही नियम आहेत. राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे. काय आहेत नियम ते पाहूया.

ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला नसावा. व्यवस्थित ठिकाणी ध्वज फडकावावा.

भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे. त्याबरोबरीच्या किंवा त्यापेक्षा उंचीवर इतर कोणताही ध्वज फडकवू नये.

कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.

ध्वज फडकावताना नारंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.

ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.

राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तर पाण्यावर तरंगलेलाही नसावा. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसेच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये.

सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com