तरुण उद्योजकाचा बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हार्ट अटॅकने मृत्यू
Admin

तरुण उद्योजकाचा बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हार्ट अटॅकने मृत्यू

हृदय विकाराचा झटका येण्याच्या घटना सध्या जास्त प्रमाणात घडत आहेत. अशीच एक घटना परभणीत घडली आहे. तरुण उद्योजक असलेल्या 44 वर्षीय सचिन तापडिया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

हृदय विकाराचा झटका येण्याच्या घटना सध्या जास्त प्रमाणात घडत आहेत. अशीच एक घटना परभणीत घडली आहे. तरुण उद्योजक असलेल्या 44 वर्षीय सचिन तापडिया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झाला आहे. बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटनचा एक राऊंड खेळल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. याच झटक्यात त्यांचा मृत्यू झाला. ही सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत.

तापडिया ऑटो कन्सल्टन्सीचे मालक सचिन तापडिया हे काल सकाळी बॅडमिंटन कोर्टवर नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळून बसले. आणि तेव्हाच त्यांनी हृदयविकाराचा झटका आला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना उचललं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.परभणी शहरासह जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com