ताज्या बातम्या
मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उतरुन पठ्ठ्याचे आंदोलन, युवक पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलकाला ताब्यात घेतलं. मंत्रालयात तरुणाने कोणत्या कारणासाठी आंदोलन केलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
महसूल खात्यासंदर्भात तक्रार देखील या युवकाने आणली होती. दुपारच्या सुमारास एका युवकाने मंत्रालयातील जाळीवर उतरून आंदोलन केले आहे. आंदोलकाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर पोलिसांनी लगेचच धाव घेतली. पोलिसांनीही सुरक्षा जाळीवर उड्या मारत आंदोलकाला ताब्यात घेतलं. मात्र तरुणाने असे का केले? याबद्दल अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र अजून पुढे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.