ताज्या बातम्या
Mumbai Youth Congress Protest : मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन, कुणाल राऊत यांना घेतलं ताब्यात
मुंबईत युवक काँग्रेसने बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांवर आंदोलन केले. अध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महाराष्ट्रातील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पेपरफुटी संबंधित प्रश्न, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा आणि त्यांच्या रोजगाराचे प्रश्न अशा विविध प्रश्नांसाठी विधानभवनाला घेराव करणार आहे.
या घेराव आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालणार आहेत. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयातून हे नेते आणि कार्यकर्ते निघणार असून पोलिसांनी या सर्वांना कार्यालय परिसरात अडवण्याची तयारी केली आहे.