Yugendra Pawar
Yugendra Pawar

Yugendra Pawar : युगेंद्र पवार यांची अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट, म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Yugendra Pawar ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले.

या अपघाताने राज्याला मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

युगेंद्र पवार म्हणाले की, 'प्रिय अजितकाका, तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन. तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील. मिस यू अजितकाका...' असे म्हणत युगेंद्र पवार यांनी पोस्ट शेअर केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com