Zomato Parent Company Ceo Deepinder Goyal Resigns Albinder Dhindsa To Take Over Position
Zomato Parent Company Ceo Deepinder Goyal Resigns Albinder Dhindsa To Take Over Position

नेतृत्वात बदल! Zomato च्या मुख्य कंपनीच्या CEO ने दिला राजीनामा; पुढील टप्प्याची घोषणा

Zomato Parent Company Ceo Deepinder Goyal Resigns : कॉर्पोरेट क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. झोमॅटोची पालक कंपनी असलेल्या इटरनल ग्रुपमध्ये नेतृत्व बदल झाला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Zomato Parent Company Ceo Deepinder Goyal Resigns : कॉर्पोरेट क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. झोमॅटोची पालक कंपनी असलेल्या इटरनल ग्रुपमध्ये नेतृत्व बदल झाला आहे. कंपनीचे प्रमुख दीपिंदर गोयल यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली.

भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर गोयल आता कंपनीच्या बोर्डावर वाइस चेअरमन म्हणून काम पाहणार आहेत. तर इटरनल ग्रुपच्या ग्रुप सीईओ पदाची जबाबदारी आता अलबिंदर ढींडसा सांभाळणार आहेत.

नव्या प्रयोगांसाठी निर्णय

गोयल यांनी सांगितले की, त्यांना काही वेगळ्या आणि धाडसी कल्पनांवर काम करायचं आहे. अशा कल्पना सार्वजनिक कंपनीच्या चौकटीत बसत नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. कंपनीचं लक्ष पूर्णपणे मुख्य व्यवसायावर राहावं, हाच या बदलामागचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कंपनीशी नातं कायम

हा निर्णय कंपनीपासून दूर जाण्यासाठी नाही, असंही गोयल यांनी सांगितलं. गेली १८ वर्षे त्यांनी ही कंपनी उभारण्यासाठी दिली असून, पुढेही धोरण, नेतृत्व विकास आणि कंपनी संस्कृतीत त्यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

नव्या सीईओवर विश्वास

अलबिंदर ढींडसा यांच्या नेतृत्वक्षमतेवर गोयल यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला. ब्लिंकइटच्या यशस्वी प्रवासात ढींडसा यांचे मोठे योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं. पुढील काळात इटरनल ग्रुप अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com