Sanjay Raut
Sanjay Raut Sanjay Raut

Sanjay Raut : विनायक पांडे, यतिन वाघ यांची ठाकरे गटातून हकालपट्टी; भाजपात प्रवेशाची तयारी

( Nashik ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

( Nashik ) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. आता भाजपाने एकाच वळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी महापौर विनायक पांडे आणि यतिन वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत.

यासोबतच काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार सजय राऊतांनी ट्विट टाकत विनायक पांडे,यतिन वाघ यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी...पक्षविरोधी कार्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले की... पक्ष विरोधी कारवायां बद्दल.. नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र! असे संजय राऊत लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com