India
पुढच्या महिन्यात 2 लाख आयसीयू बेड तयार ठेवा’ ; निती आयोगाच्या सुचना
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.मात्र असं असलं तरी कोरोनाचं संकट काही टळलेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
"कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपल्याला सज्ज राहणं गरजेचं आहे. एका दिवसात ४ ते ५ लाख कोरोना रुग्ण येण्याचा अंदाज आहे. पुढच्या महिन्यात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहीजेत. यात व्हेंटिलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड, ७ लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड आणि १० लाख कोविड आयसोलेशन बेड असावेत". अशा सूचना निती आयोगाने दिल्या आहेत.
भारतात डेल्टा विषाणूंचे संकट मात्र कायम आहे.तिसरी लाट डेल्टा विषाणूंची असेल की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे.