ऐन दिवाळीत दुकान फोडून पाच लाखाचे दागिने लंपास

ऐन दिवाळीत दुकान फोडून पाच लाखाचे दागिने लंपास

Published by :
Published on

मंगेश जोशी | जळगाव शहरातील ढाकेवाडी परिसरात असलेले ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत तिजोरी फोडून पाच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहे दरम्यान सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वानपथक यांच्या वतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

जळगाव शहरातील ढाकेवाडी परिसरात प्रसन्न प्रदीप सराफ यांचे आपल्या घराबाहेरच नंदुरबारकर ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे. शनिवारी प्रसन्न सराफ यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकान फोडून दुकानातील पाच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. दरम्यान रविवारी पहाटे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ज्वेलर्सचे मालक प्रदीप सराफ यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंथा, यांच्यासह एमआयडीसी पोलिस दाखल होऊन श्वान पथकाच्या वतीने पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com