Health
HealthLokshahi Team

ऍसिडिटीमुळे त्रस्त आहात ? मग हे वाचाच

ऍसिडिटी वाल्यांसाठी आरोग्यास काही लाभदायक सल्ले...
Published by :

तुम्हीही ऍसिडिटी(Acidity) आणि पोटात जळजळीने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. होय या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही घरबसल्या या समस्यांपासून काहीक्षणात सुटका मिळवू शकता. वास्तविक स्थिती पाहता ही समस्या आता सर्रासपणे होत आहे. पोटात तीव्र दुखणे, जळजळ, सूज येणे, उचकी येणे, पोट फुगणे त्याचवरोबर मळमळ होणे ही लक्षणे आहेत.

Health
जगातील सर्वात सुंदर “या” 5 महिला क्रिकेटर

पोटाच्या आरोग्यासाठी केळी खूप फायदेशीर असते. केळ्यामध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पचनशक्ती वाढते. यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते आणि पोटात श्लेष्माचे उत्पादन वाढवण्यासही मदत होते. त्यामुळे पोटात ॲसिड तयार होत नाही. त्यामुळे पिकलेली केळी जरूर खावी.

आता दुसरा पदार्थ म्हणजेच थंड ताक.

खरं तर थंड ताक ऍसिडिटीसाठी खूप असं चांगलं असल्याचं म्हटलं जातं. पोटाच्या जळजळीपासून आराम मिळण्यासाठी एक ग्लास थंड ताक प्या, लगेच आराम मिळेल. ताकामध्ये लैक्टिक ऍसिड असते जे सेप्टममधील आम्लता तटस्थ करते. त्याच ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक्स असतात ज्यामध्ये चांगले बॅक्टेरिया गॅस तयार होण्यास आणि फुगण्यास प्रतिबंध करतात.

Health
Beauty Care: उन्हाळ्यात त्वचा थंड ठेवण्यासाठी हे तीन प्रकारचे स्क्रब वापरा..
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com