Health
HealthLokshahi Team

वजन कमी करण्याचे खास उपाय; जाणून घ्या सविस्तर

पाणी पिल्याने वजन अगदी सहजगतीने कमी करता येते
Published by :

वजन कमी करण्याच्या (weight loss)धडपडीत कोणीही कोणतीही सूचना देत असतो. लोक त्याचा आंधळेपणाने पालन करतात. परंतु तुम्ही कधी पाणी पिऊन वजन कमी करण्याचा पर्याय एकलात का? कदाचित नाही….तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने पाणी पिल्याने वजन अगदी सहजगतीने कमी करता येते. चला तर मग जाणून घेऊयात की पाणी कसे काम करते. (weight loss)

वजन कमी करत असताना कॅलरीजचे सेवन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते आणि पाण्यामध्ये कॅलरीज अजिबात नसतात. शून्य टक्के कॅलरीज म्हणजे वजन अजिबात वाढणार नाही. यासोबतच आवश्यक प्रमाणात पाणी प्यायल्याने तंदुरुस्तीसोबतच शरीर सक्रिय राहन्यास मदत होते.

Health
वेळेवर झोप लागत नाही ? जाणून घ्या उपाय

वेळोवेळी पाणी पिण्यामुळे पोट भरलेले राहते त्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. त्यामुळे जास्त खाणे टाळता येते कारण अनारोग्यकारक स्नॅकिंगची सवय वजन वाढवण्यात मोठी भूमिका बजावते.

बहुतेक लोक अन्न खाल्ल्यानंतर किंवा अन्नासोबत लगेच पाणी पितात ही आरोग्यास चांगली सवय म्हणता येणार नाही. कारण यामुळे अपचनाची समस्या तर होतेच पण वजनही वाढते. त्यामुळे वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर अर्धा तास पाणी प्या. या गोष्टींच्या मदतीने तुम्ही सहज वजन नियंत्रणात ठेवू शकता.

Health
‘ब्लड प्रेशर’ कमी ठेवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com