'या' रहस्यमयी मंदिरात जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला दिली जाते 21 तोफांची सलामी

'या' रहस्यमयी मंदिरात जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला दिली जाते 21 तोफांची सलामी

कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली जाते. अशीच एक अनोखी पध्दत राजस्थान मधील एका मंदिरातील पूजेची प्रथा आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोरोनाने राज्यात अगदी धुमाकूळ घातला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर दहीहंडी हा उत्सव मोठा उत्साहात साजरा होत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने जन्माष्टमी साजरी केली जाते. अशीच एक अनोखी पध्दत राजस्थान मधील एका मंदिरातील पूजेची प्रथा आहे. वल्लभ सांप्रदायातील सर्वात मोठे कृष्ण मंदिर म्हणजेच नाथजी द्वारा स्थापित श्रीनाथजी धाम. या मंदिरात वर्षाचे ३६५ दिवस भक्तांची गर्दी असते. साहजिकच कृष्ण जन्माष्टमीचा मोठा सोहळा या मंदिरात पार पडतो. विशेष म्हणजे जन्माष्टमीला या मंदिरात कृष्णाला २१ तोफांची सलामी दिली जाते. मागील ४०० वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे.

मागील ४०० वर्षांपासून या मंदिरात बाळ कृष्णाच्या मूर्तीची पूजा केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्मानंतर म्हणजेच रात्री १२ वाजता मंदिरातील दोन तोफांमधून कान्हाला २१ तोफांची सलामी दिली जाते. या तोफा नर आणि मादी तोफा या नावांनी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी प्रशिक्षित होमगार्ड्सच्या हस्ते ही तोफांची सलामी दिली जाते.

श्रीनाथजी मंदिरातील आणखी एक प्रथा लक्ष वेधून घेते, ती म्हणजे या मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सोबत तांदूळ घेऊन येतात. कृष्णच्या मूर्तीवर अक्षता अर्पण केल्या जातात ज्यानंतर मंदिरातील पुजाऱ्यांकडून हे तांदूळ तिजोरी मध्ये ठेवले जातात. या अक्षतांमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णच प्रतिबिंब दिसत असल्याचे सांगितले जाते.

'या' रहस्यमयी मंदिरात जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाला दिली जाते 21 तोफांची सलामी
श्रीकृष्ण जयंतीनिमित्त 25 लाखांचा झोपाळा, 7 किलो चांदी आणि इतकं सोनं, बघ्यांची गर्दी जमली
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com