गणेशोत्सव 2024
Pune : पुण्यात गेल्या 22 तासांपासून गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू
दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला.
चंद्रशेखर भांगे, पुणे
दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना काल निरोप देण्यात आला. बाप्पाची सेवा केल्यानंतर काल थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले गेले.
पुण्यात गेल्या 24 तासांपासून गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे काल विसर्जन झाले.
मात्र अजूनही काही मंडळांच्या गणपती बाप्पांना निरोप देणं बाकी आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती, जिलब्या मारुती या मंडळाची मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरती सुरू आहे.
24 तासांपासून मिरवणूक चालू असली तरी गणेशभक्तांची गर्दी अजूनही पाहायला मिळत आहे. भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणूकीत सामील झालेलं पाहायला मिळत आहे.