Central Government Dearness Allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारीच्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार

Central Government Dearness Allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारीच्या पगारात वाढीव महागाई भत्ता मिळणार

त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा आता सरकारी कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ होणार आहे. आधी 50 % महागाई भत्ता मिळत असे मात्र आता तो वाढून 53 % झाला आहे. हा वाढीव महागाई भत्ता 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आले होता. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा आता सरकारी कर्मचाऱ्यांना यांचा फायदा होणार आहे. या निर्णयाची आता अंमलबजावणी सुरु झाली असून फेब्रुवारी महिन्यात वाढीव पगार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या. मात्र कर्मचारी शिक्षकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे आरोप केले गेले. आता या वाढीव महागाई भत्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सध्याच्या घरभाडे भत्त्यात देखील सप्रमाण वाढ मिळाली आहे.ही वाढ न मिळाल्याने राज्यभर कर्मचारी-शिक्षकांमध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला होता.

7 व्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य सरकारच्या विचाराधीन होता.

राज्य सरकारच्या 25 फेब्रुवारीला निर्णयानुसार 1 जुलै 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरुन 53 टक्के करण्यात आला आहे. या महागाई भत्ता वाढ 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा,असे आदेश देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com