weight loss
weight lossTeam Lokshahi

रोजच्या आहारात करा फक्त 'या' पदार्थाचा समावेश; वजन झटपट होईल कमी

तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा की ज्याच्या उपयोग वजन कमी होण्यासाठी होईल.
Published by :
shamal ghanekar

तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा की ज्याच्या उपयोग वजन कमी होण्यासाठी होईल. तुम्ही अनेक घरगुती उपायही करू शकता ज्यामुळे तुमचे वाढते वजन कमी होण्यास मदत करू शकते.

जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये मधाचा समावेश केल्याने त्याचा तुम्हाला फायदाचं जाणवेल. मधामध्ये काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने तुमचे वाढते वजन कमी होण्यास मदत होईल. तर चला जाणून घेऊ या. वजन कमी करण्यासाठी मधामध्ये कोणत्या गोष्टी मिसळून खाऊ शकतो.

weight loss
ब्लॅक हेड्सपासून हवी आहे सुटका? घरी ठेवलेल्या या वस्तूंनी बनवा फेस मास्क

कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही मध मिसळून ते सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने तुमची वाढती चरबी कमी होण्यास मदत होते. नसेल तर तुम्ही फक्त मध आणि कोमट पाणी पिऊ शकता. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबूचा वापर करू शकता. पाण्यात लिंबू आणि १ चमचा मध मिसळून तुम्ही पिऊ शकता.

तुमची पोटाची वाढती चरबी कमी करण्यासाठी मधासोबत लसूणाचाही सेवन करू शकता. २ लसणाच्या पाकळ्यासोबत जर तुम्ही मधाचे सकाळी सेवन केल्याने तुमचे वजन कमी होण्यास फायदेशीर ठरते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हे मदत करते.

तुमच्या पोटाची वाढती चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ताकही पिऊ शकता. तुम्ही जर ताकामध्ये मध मिसळूनही पिऊ शकता. त्यामुळे तुमची पचनशक्तीही सुधारते. आणि त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com