दिनविशेष 13 डिसेंबर 2023 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना
Dinvishesh 13 December 2023 : सध्या डिसेंबर महिना सुरू झाला आहे. तर डिसेंबर महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 13 डिसेंबर या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
आज काय घडलं?
२०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
२००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
२००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोय्यबाच्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
१९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४१: दुसरे महायुद्ध हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
आज यांचा जन्म
१९५५: मनोहर पर्रीकर - गोव्याचे १०वे मुख्यमंत्री - पद्म भूषण (मरणोत्तर) (निधन: १७ मार्च २०१९)
१९५४: हर्षवर्धन - भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी
१९४०: संजय लोळ - भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक (निधन: १८ जुन २००५)
१९२६: कमल नारायण सिंग - भारताचे २२वे सरन्यायाधीश (निधन: ८ सप्टेंबर २०२२)
१८९९: पांडुरंग नाईक - प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर (निधन: २१ ऑगस्ट १९७६)
आज यांची पुण्यतिथी
१९९६: शिरुभाऊ लिमये - स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक
१९९४: तात्यासाहेब कोर - वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक (जन्म: १७ ऑक्टोबर १९१७)
१९८६: स्मिता पाटील - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (जन्म: १७ ऑक्टोबर १९५५)