Happy Holi 2022 | जगभरात होळीचा सण कसा साजरा केला जातो ?
होळी (Holi) वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.
यावेळी 18 मार्च रोजी भारतात रंगांची होळी खेळली जाणार आहे.यावेळी होळी 18 मार्चला आहे. दुसरीकडे 17 मार्चला होळी दहन होणार आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी लोक विधिपूर्वक पूजा करतात. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते. प्रत्येक कामात यश मिळते अशी मान्यता आहे.
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णू चे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपू ला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे.
ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लाद ला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्या सोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं कि तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेंव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लाद ला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अश्या प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.
कशी साजरी केली जाते होळी
होळी संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते. होळी चा हा सण पाहण्यासाठी लोक वज्र, वृंदावन, गोकुळ अश्या ठिकाणी जातात. आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते. वज्र ला होळी च्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात. हि उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खासकरून वज्र या जातात. बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते, आणि नाच गाण्यांसोबत एकमेकांना भेटून आनंदाने सण साजरा करतात.