Holi 2025 Wishes : होळी पेटू दे, द्वेष मत्सर जळू दे ! आपल्या प्रियजनांना द्या होळीनिमित्त 'या' शुभेच्छा
होळी हा सण हर्षाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा म्हणून साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या होळी या सणाची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहतात. अस असताना होळीचा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यावर्षी होलिका दहन 13 धुलिवंदन 14 तारखेला आहे. होळी या सणानिमित्त आपण आपल्या प्रियजनांना अनेक माध्यमातून शुभेच्छा पाठवतो. यासाठीच होळीच्या निमित्ताने मित्र-परिवाराला आणि प्रियजनांना द्या 'या' शुभेच्छा.
होलिका दहनात नकारात्मकतेचा नाश होतो,
या होळीत तुमच्या आयुष्यात सुद्धा आनंद येवो,
होळीच्या लाख लाख शुभेच्छा !
होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,
सुख आरोग्य व शांती नांदो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
वाईटाचा होवो नाश
आयुष्यात सुखाची येवो लाट
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी पेटू दे
द्वेष, मत्सर जळू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीची उधळण होऊ दे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!