आज श्रावणातले दुसरे मंगळा गौरी व्रत; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

आज श्रावणातले दुसरे मंगळा गौरी व्रत; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

आज श्रावण महिन्यातले दुसरे मंगळा गौरी (Mangla Gauri 2022) व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. असे सांगितले जाते.
Published by :
Siddhi Naringrekar

आज श्रावण महिन्यातले दुसरे मंगळा गौरी (Mangla Gauri 2022) व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळा गौरी व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. असे सांगितले जाते.

मंगळागौरीची प्रथा :

श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्ष सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्ष हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा लागतो.

मंगला गौरी व्रताची तिथी

श्रावण महिना यावेळी 29 जुलैपासून सुरू झाला असून तो 27 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या श्रावणमध्ये चार मंगळवार आहेत. पहिले मंगळा गौरी व्रत – 2 ऑगस्ट 2022, मंगळवार दुसरे मंगळा गौरी व्रत – 9 ऑगस्ट 2022, मंगळवार तिसरे मंगला गौरी व्रत – 16 ऑगस्ट 2022, मंगळवार चौथे मंगला गौरी व्रत – 23 ऑगस्ट 2022, मंगळवार

मंगळागौर पूजेची पद्धत

श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवार सकाळी चौरंगाला चार बाजूंना केळीचे खांब बांधून मखर करावे. ते मखर उपलब्ध होतील त्या पानाफुलांनी सजवावे. नंतर चौरंगावर गौरीच्या मूर्तीची स्थापना करावी. चौरंगाशेजारी पाटा-वरवंटा ठेवावा. व्रतकर्त्या नवविवाहित मुलीने स्नान करून चांगली साडी नेसून अलंकार घालून प्रारभी संकल्प करून मग गौरीची षोडशोपचारी पूजा करावी. यथाविधी पूजा करून मग प्रथम पूजा करणाऱ्या पुरोहितास सौभाग्यवायन दिले जाते. नंतर सोळा वातींच्या दिव्याने किंवा सोळा निरांजने ताटात घेऊन त्यानी देवीची मंगलारती करावी. आरतीनंतर त्या व्रतकर्तीने आणि इतर स्त्रियांनीही हातात अक्षता घेऊन मंगळागौरीची कथा ऐकण्यासाठी बसावे. पूजेनंतर घरच्यांना प्रसाद वाटप करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com